नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा!; LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा!; LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

दिल्ली | Delhi

आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षानिमित्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात १०० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, ही कपात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर (Commercial Gas Cylinder) करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा!; LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Rates) कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा!; LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

१०० रुपयांच्या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २००१ रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २०७७ रुपयांवर आली आहे. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५१ रुपये झाली आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा!; LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

दरम्यान नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळेच मुंबईत राहणाऱ्या लोकांना घरगुती गॅस सिलेंडर ९०० रुपयांना अनुदानाशिवाय मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये ९००, कोलकातामध्ये ९२६, चेन्नईमध्ये ९१६, लखनऊमध्ये ९३८, पटनामध्ये ९९८ रुपयांना मिळणार आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा!; LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com