लिज ट्रस UK च्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांचा पराभव

लिज ट्रस UK च्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांचा पराभव

दिल्ली | Delhi

युकेचे (United Kingdom) पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) पायउतार झाल्यानंतर पुढचे पंतप्रधान (Prime Minister of United Kingdom) कोण याबाबत जगभरात प्रचंड उत्सुकता होती.

युकेच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस (Liz Truss) यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस आज (मंगळवार) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

लिझ ट्रस यांना ८१,३२६ मते मिळाली, तर ऋषी सुनक यांना ६०,३९९ मते मिळाली, तर मतदानाची टक्केवारी ८२.६ टक्के होती. लिज ट्रस यांनी ही निवडणूक जिंकून नवा विक्रम केला आहे. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर त्या युकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com