नवी दिल्ली -

अयोध्येतून रामलीलाचा कार्यक्रम डीडी नॅशनल वाहिनीवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान संध्याकाळी

7 वाजल्यापासून याचे थेट प्रसारण होणार असल्याची माहिती दूरदर्शन आणि डीडी न्यूजचे महासंचालक मयांक अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल यांनी ट्विट करीत म्हटलं, 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डीडी नॅशनलवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अयोध्येतून रामलीला कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता डीडी भारतीवरुन तर दुपारी 3 वाजता डीडी नॅशनलवरुन या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण केले जाणार आहे.

रवि किशन, मनोज तिवारी, आसरानी, विंदू दारासिंह, रझा मुराद या सिनेक्षेत्रातील दिग्गजांसह इतर अनेक प्रसिद्ध कलाकार यामध्ये भूमिका साकारणार आहेत.