महामहोपाध्याय पू. भद्रेशस्वामी यांना जीवन गौरव

महामहोपाध्याय पू. भद्रेशस्वामी यांना जीवन गौरव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आयसीपीआर (ICPR) संस्थेच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार महामहोपाध्याय पू. भद्रेश स्वामी यांना प्रदान करण्यात आला आहे...

अक्षरधाम दिल्ली (Akshardham, Delhi) येथे अक्षर-पुरुषोत्तम दर्शन विषयावर आयोजित तिन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद (ICPR) व बीपीएस स्वामी नारायण शोध संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या परिसंवादात अक्षर-पुरुषोत्तम दर्शनच्या विविध भूमिकांवर शोधपत्र सादर करण्यासाठी देशभरातून तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यात प्रामुख्याने दिल्ली विश्वविद्यालयापासून तिरुपती राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तसेच कोलकाता महाविद्यालय ते सोमनाथ विश्वविद्यालयाच्या तज्ज्ञांनी शोधपत्र प्रस्तुतीसाठी हजेरी लावली. अमेरिका, इंग्लंडहूनही मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले.

प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव राम माधव (BJP leader ram madhav), आयसीपीआरचे अध्यक्ष आर. सी. सिन्हा (R. C. Sinha), अखिल भारतीय दर्शन परिषदेचे जटाशंकर तिवारी (Jatashankar Tiwari), तिरुपती राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलपती मुरलीधर शर्मा (Muralidhar Sharma), आयसीपीआरचे सदस्य सचिव सच्चिदानंद मिश्रा (Sachchidananda Mishra), संस्कृत भारतीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री चमूकृष्ण शास्त्री (Chamukrishna Shastri), रामकिशोर त्रिपाठी (Ramkishor Tripathi) आदी उपस्थित होते.

यावेळी महामहोपाध्याय पू. भद्रेशदास स्वामी यांना भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कोण आहेत महामहोपाध्याय पू. भद्रेशदास स्वामी

महामहोपाध्याय पू. भद्रेशदास स्वामी यांनी उपनिषद, गीता तसेच ब्रहमसूत्र या विषयांवर संस्कृत भाषेत मोठ्या प्रमाणात लिखाण केलेले आहे. भगवान स्वामी नारायण यांनी दिलेल्या सिद्धांतांवर स्वामींनी लिहिलेले अक्षरपुरुषोत्तम दर्शन (स्वामीनारायण दर्शन) हा मौलिक प्रबोधन ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

Related Stories

No stories found.