लीबियामध्ये महापूर! सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, अनेक शहरं उद्ध्वस्त, 30 हजारांहून अधिक बेपत्ता

लीबियामध्ये महापूर! सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, अनेक शहरं उद्ध्वस्त, 30 हजारांहून अधिक बेपत्ता

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

सोमवारी लीबियामध्ये (Libya) आलेल्या महापुरामुळे (Flood) अनेक किनारी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. महापुरात आतापर्यंत सहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. लीबियामधील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी ही माहिती दिली आहे.

भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळामुळे लीबियामध्ये महापूरची स्थिती उद्भवली आहे. किनारी भागात असलेल्या एकट्या डेर्ना शहरातच 30 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

लीबियामध्ये महापूर! सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, अनेक शहरं उद्ध्वस्त, 30 हजारांहून अधिक बेपत्ता
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

डेर्ना शहरातील सात एंट्री पॉइंटमधील केवळ दोनच सध्या सुरू झाले आहेत. अधिकारी शहरांमधील मलबा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहा हजारांहून अधिक नागरिक मलब्याखाली दबले गेले असावेत, आणि तेवढेच लोक समुद्रात वाहून गेले असण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. किनारी भागांतील शहरांमध्ये सुमारे एक लाख लोक राहत होते, असेदेखील येथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

लीबियामध्ये महापूर! सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, अनेक शहरं उद्ध्वस्त, 30 हजारांहून अधिक बेपत्ता
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे आमदार विधानभवनात दाखल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com