सरकारने "या" गोष्टींवरील GST केला कमी !

केंद्र सरकारचा दिलासा
सरकारने "या" गोष्टींवरील GST केला कमी !

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने रोजच्या वापरातील काही जीवनावश्यक वस्तूंवरील GST कमी केला आहे. आज केसांसाठीचे तेल, टूथपेस्ट आणि साबण अशा रोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर कमी झाले आहेत. अशा वस्तूंचे जीएसटीपूर्व काळातील कर दर 29.3% होते, जे आता 18% पर्यंत कमी झाले आहेत.

निवासी संकुलांच्या बांधकामासाठी साधारणत: 5% आणि परवडणाऱ्या घरांसाठी 1% इतकी घट झाली आहे. रेस्टॉरंट्सचे कर सुद्धा 5% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. पूर्वी सिनेमाच्या तिकिटांवर 35% ते 110% कर आकारला जात असे, जीएसटीच्या काळात तो 12% आणि 18% पर्यंत खाली आला आहे.

तसेच फ्रिज, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, फूड ग्राइंडर्स आणि मिक्सर, भाज्यांचे ज्युस एक्सट्रॅक्टर, शेव्हर्स, हेअर क्लीपर, वॉटर हीटर्स, हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक स्मूथिंग आयर्न, टीव्ही (32 इंच पर्यंत) अशा सर्व वस्तुंवरचे कर 31.3% वरून 18% पर्यंत कमी झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com