सिद्धू मूसेवालाला का मारलं?; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट

सिद्धू मूसेवालाला का मारलं?; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे....

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईने हत्येची कबुली दिली होती. आता या हत्येमागचे कारण सांगत लॉरेन्स बिश्नोईने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी एकूण 8 शूटर बोलावण्यात आले होते. यात वेगवेगळ्या राज्यांमधून हे शूटर मागवण्यात आले होते. यात पुण्यातीलही दोन शूटरची नावे समोर आली होती.

सिद्धू मूसेवालाला का मारलं?; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट
शीतल म्हात्रे प्रकरणावरून राऊतांची खोचक टीका ; म्हणाले, राज्यात सध्या...

लॉरेन्स बिष्णोईने थेट तुरुंगातून सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या कारणाचा गौप्यस्फोट केला आहे. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचे त्याने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सिद्धू मूसेवालाला का मारलं?; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट
लॉन्ग मार्चमध्ये नवा ट्विस्ट! शिष्टमंडळाचा बैठकीस नकार; जे. पी. गावित म्हणाले, आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी...

त्याने म्हटले आहे की, सिद्धू मुसेवाला गाण्यांमध्ये जसा डॉन दिसत होता, तसाच तो खऱ्या आयुष्यात बनण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपण त्याला ठार केल्याचा खुलासा लॉरेन्सने केला आहे. सिद्धूची हत्या करण्यासाठी त्याने गँगस्टर गोल्डी बरारची मदत घेतल्याचेही त्याने सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com