फारूक अब्दुला यांची नजरकैद हटवली
देश-विदेश

फारूक अब्दुला यांची नजरकैद हटवली

Sarvmat Digital

दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर अनेक दिवसांपासून नजरकैदेत असलेले माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांची नजरकैद मागे घेण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

5 ऑगस्ट रोजी पासून फारूक अब्दुल्ला, त्याचा मुलगा उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती सोबत इतर नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी देशातील आठ प्रमुख विरोधी पक्षांनी भाजप सरकारकडे काश्मीरमध्ये नजरकैदेत असलेल्या सर्व नेत्यांना लवकरात लवकर मुक्त करावे अशी मागणी केली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com