चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांना पाच वर्षांचा तुरुंगवास; दंड ऐकून धक्का बसेल

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांना पाच वर्षांचा तुरुंगवास; दंड ऐकून धक्का बसेल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दि. १५ फेब्रुवारीला ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याचा (Fodder scam) (डोरांडा ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार) निकाल आला. याप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने (Special CBI Court) राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवले....

आज विशेष सीबीआय कोर्टाकडून (CBI Court) लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना ६० लाखांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या विरोधातील हा पाचवा चारा घोटाळा आहे.

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांना पाच वर्षांचा तुरुंगवास; दंड ऐकून धक्का बसेल
चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव दोषी; पुन्हा तुरुंगात जाणार?

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी दोरांडा कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्यासह ७५ आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले होते. इतर २४ जणांची यात निर्दोष सुटका करण्यात आली होती. ३६ जणांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर दोषींना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात येत आहे.

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांना पाच वर्षांचा तुरुंगवास; दंड ऐकून धक्का बसेल
'अभिजात मराठी'साठी दिल्लीत भेटीगाठी

काय आहे प्रकरण?

१९९६ साली बिहारमध्ये (Bihar) उघड झालेल्या चारा घोटाळा (Fodder Scam) प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना १९९७ मध्ये अटक (Arrested) करण्यात आली होती. हा घोटाळा झाला, तेव्हा लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांना जामीनदेखील देण्यात आला.

त्यानंतर थेट २०१३मध्ये सीबीआय कोर्टाने (CBI Court) चायबासा कोषागारातून बेकायदेशीररीत्या ३७.६७ कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी मानले. त्यांना पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याच वर्षी डिसेंबरमध्ये जामीन मंजूर केला.

त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये लालू यादव यांना देवघर कोषागारातून ८९.२७ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या पैसे काढण्याची एकूण पाच प्रकरणे चारा घोटाळा म्हणून जाहीर झाली होती. यापैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव दोषी सिद्ध झाले आहेत. देवगड, चायबासा, रांचीतील डोरांड आणि डमका कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालू यादव दोषी आढळले आहेत. बिहारच्या पशूसंवर्धन विभागात एकूण ९५० कोटींचा चारा घोटाळा झाल्याचे १९९६ मध्ये उघड झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com