चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव दोषी; पुन्हा तुरुंगात जाणार?

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव

रांची | Ranchi

आज ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याचा (Fodder scam) (डोरांडा ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार) निकाल आला. याप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने (Special CBI Court) राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवले आहे....

तसेच २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी २१ फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. कोर्टाने (Court) दोषी ठरवताच पोलिसांनी (Police) लालू प्रसाद यादव यांना ताब्यात घेतले आहे.

लालू यादव यांना तुरुंगात न पाठवता रिम्समध्ये पाठवण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी अर्जद्वार केली आहे. यावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.

लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरवल्याची माहिती समोर येताच पाटण्यापासून रांचीपर्यंतच्या त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. कोर्टाचा परिसर आरजेडीच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.

लालू प्रसाद यादव
दाऊदच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; महाराष्ट्रातील मंत्र्याचाही सहभाग?

कोर्ट आज ३ वर्षांपेक्षा कमी कालवधीची शिक्षा काही आरोपींना सुनावेल, असे सांगण्यात येत आहे. तर लालूंसह १० आरोपींना स्वतंत्रपणे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यामुळे लालूंना ३ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास होऊ शकतो, असे मानले जात आहे.

लालू यादव यांच्या शिक्षेच्या प्रश्नावर २१ फेब्रुवारीला निर्णय होईल, असे कोर्टाचे वरिष्ठ वकील राजतिक प्रसाद यांनी सांगितले. त्यांना मेडिकल टर्मवर रिम्समध्ये हलवल्याची चर्चा आहे.

लालू प्रसाद यादव
रासबिहारी-मेरी लिंक रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

काय आहे प्रकरण?

१९९६ साली बिहारमध्ये उघड झालेल्या चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना १९९७ मध्ये अटक करण्यात आली होती. हा घोटाळा झाला, तेव्हा लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांना जामीनदेखील देण्यात आला.

त्यानंतर थेट २०१३मध्ये सीबीआय कोर्टाने चायबासा कोषागारातून बेकायदेशीररीत्या ३७.६७ कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी मानले. त्यांना पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याच वर्षी डिसेंबरमध्ये जामीन मंजूर केला.

त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये लालू यादव यांना देवघर कोषागारातून ८९.२७ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या पैसे काढण्याची एकूण पाच प्रकरणे चारा घोटाळा म्हणून जाहीर झाली होती. यापैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव दोषी सिद्ध झाले आहेत. देवगड, चायबासा, रांचीतील डोरांड आणि डमका कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालू यादव दोषी आढळले आहेत. बिहारच्या पशूसंवर्धन विभागात एकूण ९५० कोटींचा चारा घोटाळा झाल्याचे १९९६ मध्ये उघड झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com