आडवाणी
आडवाणी
देश-विदेश

माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले - आडवाणी

रथयात्रा काढून मी आपले कर्तव्य बजावले होते

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

आज माझे सर्वांत मोठे स्वप्न पूर्ण झाले. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे. Lal Krishna Advani

कधीकधी एखाद्याच्या आयुष्यात महत्त्वाची स्वप्ने पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो. असेच एक स्वप्न माझे आहे, ते हृदयाजवळ आहे आणि ते आता पूर्ण झाले आहे, रामजन्मभूमी आंदोलनात 1990 मध्ये सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढून मी आपले कर्तव्य बजावले होते. ज्यात असंख्य जण सहभागी झाले. त्यांच्या आकांक्षा, ऊर्जा आणि उत्कटतेला बळकटी मिळाली, रामजन्मभूमी आंदोलनात मोलाचे योगदान आणि बलिदान देणार्‍या भारत आणि जगाच्या पाठीवरील अनेक संत, नेते आणि नागरिकांबद्दल मी आज कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, असही ते म्हणाले.

सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या वारशात भारत सन्माननीय स्थानावर आहे, अभिमान आणि अलंकाराचे प्रतीक आहे. माझा विश्वास आहे की, हे मंदिर सर्व भारतीयांना त्यांच्या गुणांबद्दल सांगेल. सर्वांसाठी न्याय मिळवून मजबूत, समृद्ध, शांततापूर्ण आणि सुसंवादी राष्ट्र म्हणून प्रतिनिधित्व करेल, असा माझा विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com