शहीद कर्नलची पत्नी झाली उपजिल्हाधिकारी
देश-विदेश

शहीद कर्नलची पत्नी झाली उपजिल्हाधिकारी

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिले नियुक्ती पत्र

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीत कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले होते. martyred Colonel santosh babu आता तेलंगण सरकारने त्यांच्या पत्नीची उपजिल्हाधिकारीपदावर Deputy Collector of Telanganaनियुक्ती केली आहे.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव Chief Minister K Chandrashekhar Rao यांनी बुधवारी संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांना सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र दिले. Santosh Babu's wife Santoshi was on Wednesday appointment letter कर्नल यांच्या पत्नीची नेमणूक ही हैदराबाद किंवा जवळपासच्या भागात करावी, असे आदेशही त्यांनी दिले. याआधी तेलंगण सरकारने शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयांची निधी देण्याची घोषणा केली होती.

कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी या आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह आणि 3 वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहत आहेत.

दरम्यान गेल्या महिन्यात 15 जूनला गलवान खोर्‍यात सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. या संघर्षात कामांडींग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे एकूण 20 जवान शहीद झाले.

या चकमकीत कमीतकमी 43 चिनी सैनिक मारले गेले. पण चीनने यासंदर्भातील माहिती लपवली आहे. सततच्या तणावामुळे कर्नल संतोष बाबू चिनी सैनिकांशी बोलण्यासाठी गेले होते. पण तिथून परतत असताना चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com