राफेलसह हॅमर क्षेपणास्त्रामुळे चीनला भरणार धडकी
देश-विदेश

राफेलसह हॅमर क्षेपणास्त्रामुळे चीनला भरणार धडकी

फ्रान्स लवकरच देणार भारताला

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi - चीनच्या विश्‍वासघातकी धोरणामुळे लडाख सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. India-China standoff चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने देखील पूर्ण तयारी केली आहे. हवाईदलाने Indian Air Force (IAF) अन्य एका घातक शस्त्राची ऑर्डर दिली आहे. हे शस्त्र म्हणजे हॅमर क्षेपणास्त्र hammer missiles आहे. राफेलमधून Rafale fighter jets डागल्यानंतर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. हवेतून जमिनीवर मारा करणारी ही क्षेपणास्त्रे फ्रान्सकडूनच मागविण्यात आली आहेत.

सैन्यासह नौदल आणि हवाईदल देखील हाय अलर्ट मोडमध्ये आहे. भारताने चीनला स्पष्टपणे वादग्रस्त भागातून मागे हटण्यास सांगितले आहे. चीनचा सामना करण्यासाठी हवाईदल प्रत्येक आघाडीवर पुढे राहण्याचा प्रयत्न करत आहे.

फ्रान्स हॅमर ही घातक क्षेपणास्त्रे लवकरच भारताला देणार आहे. याचा निशाणा अचूक आहे. फ्रान्सला राफेलमध्ये हॅमर मिसाईल लावण्याचा आदेश देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

हॅमर एक मध्यम श्रेणीतील एअर टू ग्राउंड क्षेपणास्त्र आहे. सुरूवातीला राफेल लढाऊ विमानाला हॅमर क्षेपणास्त्राने सुसज्ज केले जाणार आहे. यामुळे लढाऊ विमानाची मारक क्षमता वाढेल. हे क्षेपणास्त्र 60-70 किमी सीमेत कोणत्याही प्रकारच्या लक्ष्यावर निशाणा साधण्यास सक्षम आहे. याला फ्रान्सच्या हवाई दल आणि नौदलासाठी तयार करण्यात आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com