नवी दिल्ली -

भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढतच आहे गेल्या 20 दिवसांत सीमेवर

तीनदा गोळीबार झाला आहे. पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न 29 ते 31 ऑगस्टच्या दरम्यान भारतीय लष्कराने हाणून पाडला, तेव्हा चिनी सैन्याने प्रथमच गोळीबार केला. गोळीबाराची दुसरी घटना सात सप्टेंबरला मुखपारी शिखरांच्या परिसरात घडली. तिसर्या घटनेवेळी आठ सप्टेंबरला पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी सुमारे 100 गोळ्या झाडल्या.

मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात तणाव निवळण्यासाठी वाटाघाटी होण्याआधी लडाख सीमेवर हा गोळीबार सुरू होता. दोन्ही देशांमध्ये कोअर कमांडर पातळीवरील चर्चा करण्याचे दोन्ही नेत्यांमध्ये निश्चित झाले होते; मात्र या बैठकींची तारीख आणि वेळ याबाबत चीनने सोयीस्कर मौनच बाळगले आहे. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान कोंगरूंग नाला, गोगरा आणि पँगाँग तळ्याचा फिंगर भाग या ठिकाणी एप्रिलपासून संघर्षाचे वातावरण आहे.