नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल, पाहा VIDEO

नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल, पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले १२ चित्ते आज (दि.१८) भारतात दाखल झाले. या १२ चित्त्यांना देखील नामिबियातून आणलेल्या त्या ८ चित्त्याप्रमाणेच मध्य प्रदेशातील कुतो नॅनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे.

भारताच्या चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पाशी (cheetals in Madhya Pradesh) संबंधित वन्यजीव तज्ज्ञांनी याविषयीची माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाचे (IAF) C-17 ग्लोबमास्टर विमान दक्षिण आफ्रिकेतून १२ चिल्यांना घेऊन आले असून ते आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे उतरले

नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल, पाहा VIDEO
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटला, कार दुभाजकावर आदळली, एअर बॅग उघडले पण...
नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल, पाहा VIDEO
इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००...; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या १२ चित्यांपैकी ७ नर आणि ५ मादी आहेत. शुक्रवारी (दि. १७) संध्याकाळी हे चित्ते दक्षिण आफ्रिकेतील गीतेंग येथील दम्ब अंतरराष्ट्रीय विमानतळवरून भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारताकडे रवाना झाले होते. यानंतर शनिवारी सकाळी (दि.२८) हे १२ चित्ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर पोहोचले, त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना IAF हेलिकॉप्टरद्वारे १६५ किमी अंतरावर श्योपूर जिल्ह्यातील केएनपी (कुनो नॅशनल पार्क) येथे नेले.

नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल, पाहा VIDEO
धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात

भारतातील कुनो (Cheetahs in Madhya Pradesh) येथे पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी 12 च्या सुमारास त्यांना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास बोमामध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती देखील तज्ज्ञांनी दिली आहे. केएनपीचे संचालक उत्तम शर्मा म्हणाले की, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्यांसाठी २० वेगळ्या 'बोमाची व्यवस्था केली आहे. चित्त्यांना स्वीकारण्यासाठी आमची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात आणण्याची तयारी काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झाली होती. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. १९७० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली. नंतर हा प्रकल्प बारगळला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com