Kulbhushan Jadhav Case : इस्लामाबाद कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

Kulbhushan Jadhav Case : इस्लामाबाद कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

दिल्ली | Delhi

कुलभूषण जाधव प्रकरणावर पाकिस्तानच्या कायदा मंत्रालयाने दाखल केलेल्या अपीलवर इस्लामाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणी वेळी भारत सरकारने वकील नियुक्त करण्याची मागणी केली.

कुलभूषण जाधव यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी वकिल देण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 6 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. या आधीच्या सुनावणीत न्यायालयाने पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा भारतीय उच्चायोग द्वारा वकील नियुक्ती प्रस्ताव देण्यासाठी सांगण्यात आले होते. दरम्यान, भारतान कोणत्याही पाकिस्तानी वकिलाला न्यायालयात पाठवले नाही.

दरम्यान, पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटले आहे की, भारतीय पक्ष जाधव यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय वकील देण्याबाबत मागणी करत आहे. ही मागणी असंमत आहे. जाहिद हफीज यांनी म्हटले आहे की, आम्ही वारंवार त्यांना हे सांगितले आहे की, केवळ वकीलच न्यायालयात बाजू मांडू शकतात. हे वकिलच जाधव यांचे प्रतिनिधीत्व करु शकतात. ज्यांच्याकडे पाकिस्तानी न्यायालयात बाजू मांडण्याचा परवाना आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com