कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात हायकोर्टात दाद मागता येणार

कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात हायकोर्टात दाद मागता येणार

नवी दिल्ली - पाकिस्तानातील तुरुंगात बंद असलेले भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानद्वारे सुनावलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालय विधेयक 2020 ला पाकिस्तानने गुरुवारी मंजुरी दिली आहे. हे विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आले आहे. या अध्यादेशानंतर आता कुलभूषण जाधव यांना कोणत्याही उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मिळाला आहे.

इम्रान खान सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयीन कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुनरावलोकन व पुनरावलोकन करण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी संसदेत हे विधेयक सादर केले होते. पाकिस्तानच्या संसदेत हे आंतरराष्ट्रीय न्यायालय विधेयक 2020 बहुमताने मंजुर करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या एका सैन्य न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते. त्यांना पाकिस्तानने हेरगिरीसाठी देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, कुलभूषण यांनी पाकिस्तानच्या लष्करी कोर्टात असं सांगितलं, की त्यांना इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानमध्ये आणले आणि खोट्या आरोपांत अटक केली.

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांचा आरोप फेटाळला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. लष्करी कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी कुलभूषण जाधव यांच्यावतीने भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com