
दिल्ली l Delhi
हिऱ्याची अंगठी कुणाला आवडत नाही. आपल्याकडे एक तरी डायमंड रिंग (Diamond Ring) हवी असं स्वप्नं बहुतेकांचं असतं. भारतातल्या अशाच एका डायमंड रिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.
केरळमध्ये तयार करण्यात आलेल्या अंगठीची गिनीज बुकमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे. या अंगठीत सर्वाधिक म्हणजे तब्बल २४ हजार ६७९ हिरे जडवले आहेत.
एसडब्ल्यूए डायमंड्सचे (SWA Diamonds) सराफ अब्दुल गफूर अनादियान यांनी ही अंगठी तयार केली आहे. या अंगठीचं नाव ‘अमी’ असे केले गेले असून या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे अमरत्व.