Nobel Prize 2023 : करोना लसी संशोधनासाठी योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize 2023 : करोना लसी संशोधनासाठी योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

दिल्ली | Delhi

जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान असणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली असून पहिलं नोबेल पारितोषिक वैद्यक क्षेत्रासाठी जाहीर झालं आहे.

करोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ज्ञ कॅटलिन करिको व ड्र्यु वेसमन यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्विडनच्या कॅरिलोन्स्का संस्थेच्या नोबेल परिषदेकडून करिको व ड्र्यु वेसमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षीच्या नोबेल पुरस्करांची घोषणा होण्यास वैद्यकशास्त्रातील पुरस्काराने सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत विज्ञान, साहित्य, अर्थशास्त्र व शांततेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे. १९०१ साली हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com