पठ्यानं चक्क बँकेलाच लावली आग; कारण वाचून तुम्ही व्हाल थक्क..!

पठ्यानं चक्क बँकेलाच लावली आग; कारण वाचून तुम्ही व्हाल थक्क..!

दिल्ली | Delhi

सध्याच्या जगात कोण काय करेल यांचा भरोवसा नाही. असे अनेक प्रकार आपल्या कानांवर पडलेच असतील. पण आता तर एका पठ्ठ्याने चक्क बॅंकेलाच आग लावली आहे. कर्नाटकातील (Karnataka) हावेरी (Haveri) जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

बँकेने कर्ज (loan) देण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने चक्क बँकेला आग (bank fire) लागवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत कागिनेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला बँकेतून कर्ज घ्यायचे होते, त्यासाठी त्याने बँकेत अर्ज केला होता. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याचा कर्ज अर्ज फेटाळला. कर्जाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने आरोपी पूर्णपणे निराश झाला होता.

या नैराश्यात व निराशेमध्ये आरोपीने शनिवारी रात्री बँकेत पोहोचला. तेथे खिडकी तोडून बँकेच्या आत प्रवेश केला. यानंतर त्याने पेट्रोल ओतून बॅंक पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com