तामिळनाडू : कोईंबतूरमधून कमल हसन आघाडीवर

तामिळनाडू : कोईंबतूरमधून कमल हसन आघाडीवर

कोईंबतूर दक्षिण मतदारसंघातून एमएनएमचे कमल हसन आघाडीवर आहेत. एमएनएमचे ते एकमेव उमेदवार आघाडीवर असल्याचे समजते आहे...

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी मक्कल निधी मैय्यम नावाचा पक्ष कमल हसन यांनी स्थापन केला. यानंतर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

कोईम्बतूर येथे दक्षिण मतदार संघात डीएमके आणि एआयडीएमके यांनी आपले उमेदवार उभे केलेले नव्हते. त्यांनी ही जागा कॉंग्रेस आणि बीजेपीसाठी सोडली होती.

हसन यांचा पक्ष यंदाच्या निवडणुकीत २३४ पैकी १५४ जागांवर आपले उमेदवार उभे केलेले होते. मात्र प्राप्त माहितीनुसार पक्षाचे अध्यक्ष कमल हसन वगळता कोणत्याही उमेदवाराला आघाडी घेता आलेली नाही. असे सध्याच्या कलानुसार माहिती येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com