महाराज कालीचरण अटकेत; महात्मा गांधींबद्दल अपशब्द भोवले

महाराज कालीचरण अटकेत; महात्मा गांधींबद्दल अपशब्द भोवले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना (Kalicharan Maharaj) मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूर पोलिसांनी (Raipur police) ही कारवाई केली आहे...

खजुराहो (Khajuraho) येथील बागेश्वर धामममधून (bageshwar dham) पहाटेच्या सुमारास कालीचरण महाराजांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येईल. टिकारपारा पोलीस ठाण्यात (Tikarpara Police Station) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले होते. यामुळे कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणी होत होती.

काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजांच्या अटकेसाठी पाठवले होते.

कालीचरण महाराज मध्य प्रदेशात खजुराहोपासून २५ किमी अंतरावर बागेश्वर धाम येथील एका भाड्याच्या घरात राहत होते. रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता त्यांना अटक करण्यात आली. आज पोलीस कालीचरण महाराजांना घेऊन रायपूरमध्ये पोहोचणार असल्याची माहिती रायपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल (Prashant Agarwal) यांनी दिली.

Related Stories

No stories found.