एन. व्ही. रमन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ

४८ वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार
एन. व्ही. रमन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ

दिल्ली | Delhi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश एन. व्ही. रमन्ना (NV Ramana) यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. रमन्ना हे भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. करोनामुळे शपथविधी सोहळ्यात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. अगोदरचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिलला संपल्याने उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांचा कार्यकाल पुढचे १६ महिने असणार आहे.

न्यायमूर्ती थालापती व्यंकट रमन्ना (NV Ramana) यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्ण जिल्ह्यातील पोन्नवरम गावात झाला. त्यांचे आई-वडील शेती करत होते. ते पहिल्यांदा १० फेब्रुवारी १९८३ रोजी वकील झाले. रामना यांची २७ जून २००० रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.

त्यानंतर त्यांनी १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. २७ फेब्रुवारी २०१९ पासून त्यांनी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. रमन्ना यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे.

दरम्यान २०१८ मध्ये माजी सरन्याधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील अभियोग, जम्मू- काश्‍मीरमधील इंटरनेटवरील बंदी उठविणे, सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणणे, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात बहुमत चाचणीचे निर्देश, आमदार लाच प्रकरणात राजकारण इत्यादी प्रकरणात रमन्ना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com