लेहमधील बाेगद्याचे काम लवकरच

श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर जवळपास ११,५७८ फूट उंचीवर असलेला हा बोगदा महत्त्वाचा आहे
नितीन गडकरी
नितीन गडकरी

दिल्ली - काश्मिर आणि लडाखच्या दरम्यान येणाऱ्या महत्वपूर्ण जोजिला बोगद्याचे काम लवकरच सुरू होईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

ते बोलताना म्हणाले, जोजिला बोगदा प्रकल्प मागील सहा वर्षांपासून रखडला आहे. श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर जवळपास ११,५७८ फूट उंचीवर असलेला हा बोगदा महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टी मुळे लडाख आणि काश्मीरचा संपर्क बंद होत असतो.

लडाखला जोडण्यासाठी या बोगद्याच्या प्रकल्पासाठी जवळजवळ ७५०० ते ८००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच दिल्लीला अमृतसर आणि कटडाला जोडण्यासाठी नवीन एक्स्प्रेस हायवे तयार करत असून त्याने दिल्ली ते अमृतसर हे अंतर ४ तासाने कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com