<p><strong>वाशिंग्टन - </strong></p><p>जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या अमेरिकन कंपनीची कोविड 19 ची लस क्लिनीकल चाचणीत अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचा दावा </p>.<p>कंपनीने केला आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीने जाहीर केले आहे की त्यांची स्वयंसेवकांना देण्यात आलेली लस क्लिनिकल चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचणारा अमेरिकेचा हा चौथा देश आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर अमेरिकन नागरिकांना चाचणीच्या नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संबंधी माहिती दिली.</p>