श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयानक! बायकोच्या शरीराचे १२ तुकडे अन्…

श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयानक! बायकोच्या शरीराचे १२ तुकडे अन्…

साहेबगंज | Sahibganj

राजधानी नवी दिल्लीतील 'श्रद्धा वालकर हत्याकांड' अजूनही लोक विसरलेले नाहीत. या घटनेनंतर आणखी एका प्रकरणानं देशाला हादरवून सोडले आहे. ती घटना कुणालाही सुन्न करणारी अशीच आहे.

झारखंडमध्ये पतीने आपल्या पत्नीचा १२ तुकडे करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंडमधील साहेबगंज येथील बोरीओ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रुबिका पहाडीन असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलदार अन्सारी असे खून करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी या प्रकरणात मृत महिलेचा पती दिलदार अन्सारीला अटक केली आहे. त्यानं आपल्या २२ वर्षीय पत्नीला रबिका पहाडिन हिचा कटरच्या साह्यानं खून केला. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्यानं जे केलं की, हे कमालीचे अमानुष होते. त्यानं कटरच्या साह्यानं पत्नीच्या शरीराचे तुकडे करुन ते कुत्र्यांना खाण्यास टाकले होते.

देशभरात त्या दिलदारच्या कृत्यावर सोशल मीडियातून तीव्रपणे विरोध केला जात आहे. त्यानं केलेल्या त्या गुन्ह्याबद्दल त्याला तातडीनं शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी नेटकरी करु लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com