JEE Main चा निकाल जाहीर; आजपासून JEE Advanced परीक्षेची नोंदणी प्रक्रिया, कुठे करायचा अर्ज?

JEE Main चा निकाल जाहीर; आजपासून JEE Advanced परीक्षेची नोंदणी प्रक्रिया, कुठे करायचा अर्ज?

दिल्ली | Delhi

बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेनच्या (JEE Main Exam) चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. (JEE Main Result 2021)

७ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा (JEE Main Exam) दिली. त्यापैकी ४४ उमेदवारांपैकी १०० पैकी १०० गुण मिळवत १८ उमेदवारांनी रँक क्रमांक १ मिळवला आहे. या १८ जणांमध्ये महाराष्ट्राच्या अथर्व अभिजीत तांबट (Atharva Abhijeet Tambat) याचाही समावेश आहे. अथर्व हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. आंध्र प्रदेशचे सर्वाधिक ४ तर त्यापाठोपाठ राजस्थानचे ३, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी २ विद्यार्थी टॉप १८ मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक ६ विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वनवर कर्नाटकचा गौरब दास आहे.

असा पहा निकाल -

- अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा

- होम पेजवर JEE Main 2021 session 4 results लिंकवर क्लि करा

- तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरा

- माहिती भरल्यानंतर सबमिट करा

- चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल

- तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि पुढील गोष्टींसाठी त्याची प्रिंट आऊट घ्या

JEE Main चा निकाल जाहीर जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी JEE Advanced परीक्षेची वाट पाहत आहेत. संयुक्त प्रवेश परीक्षा अ‌ॅडव्हान्सडसाठी (Joint Entrance Exam) नोंदणी १५ सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरू होईल. JEE Main परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी JEE Advanced परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर जाऊन JEE Advanced साठीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करु शकतात.

JEE Advanced साठी कशी कराल नोंदणी?

- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.nic.in. वर भेट द्या .

- त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा.

- आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा.

- यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.

- आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.

- त्यानंतर अर्ज फी सबमिट करा.

- सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

JEE Advanced परीक्षा कधी ?

२३ आयआयटीमध्ये बीटेक आणि युजी इंजिनिअरिंग प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी JEE Advanced परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ ला घेतली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com