‘जेईई’ आणि ‘नीट’ ठरल्यावेळीच
देश-विदेश

‘जेईई’ आणि ‘नीट’ ठरल्यावेळीच

एनटीएकडून शिक्कामोर्तब

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) Joint Entrance Examination Main आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा National Eligibility cum Entrance Test Undergraduate (NEET UG) ठरल्यावेळीच होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे.

एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एनटीएने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असं स्पष्ट केलं आहे.

जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com