मोठी दुर्घटना! दरीत कोसळून लष्कराचे तीन जवान शहीद

मोठी दुर्घटना! दरीत कोसळून लष्कराचे तीन जवान शहीद

कुपवाडा | Kupwara

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुपवाडा (Kupwara) जिल्ह्यातील माछिल सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भारतीय लष्करातील ३ जवान खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिन्ही जवान शहीद झाले. तिघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.

हे तीन सैनिक भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे सैनिक होते. यामध्ये १ JCO (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि २ OR (इतर रँक) यांची टीम नियमित ऑपरेशनसाठी रवाना झाली होती. मात्र बर्फामुळे खोल दरीत कोसळले.

या आधी कुपवाडामध्येच नोव्हेंबरमध्ये ग्लेशियर कोसळून तीन जवान शहीद झाले होते. ही घटना माछल सेक्टरमध्येच घडली होती. नवान गस्त घालत असताना अचावक हिमनग कोसळला होता. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला होता. तर जखमींना ग्णालयात दाखल करण्यात आले होते..

या दिवसांत काश्मीरमधील तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. हिमवृष्टीमुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ३० जानेवारीपर्यंत येथे हिमवृष्टी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कडक्याची थंडी आणि हिमवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com