श्रीनगर | Shrinagar
जम्मू-काश्मीरमधील शोपियान परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज सकाळी शोपियानच्या सुगन भागातही चकमक झाली. यावेळी जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
सुरक्षाबल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका विशेष सुचनेच्या आधारे सुगन भागात सकाळी शोधमोहीम राबवली. त्यामध्ये त्यांना दहशतवादी लपलेल्या जागेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा घेरला. बाहेर पोलीस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनीदेखील त्यास प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ही शोधमोहिम संपली असल्याचे सैन्य दलाकडून सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांकडून 1 एके आणि 2 पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत.