जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलाला मोठे यश!

‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलाला मोठे यश!

दिल्ली | Delhi

भारतीय सुरक्षा दलाला जम्मू-काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतगनागमध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. हे तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे आयजी कुमार यांनी ही माहिती दिली.

मंगळवारी सकाळी अनंतनागच्या कोकरनागमधील वैलू गावात लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लपवल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई अभियान सुरु केले आणि कारवाईला सुरुवात केली. या चकमकीत सुरक्षा दलांने दहशतवाद्यांना घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दल आणि पोलिसांनी केलेल्या प्रत्युरादाखल गोळीबारात तिन दहशतवादी ठार केले.

ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक असलेला उबेद शफी याचा १ एप्रिल रोजी अरिबाग येथे भाजपा नेत्याच्य़ा घरावर लष्कर ए तोयबाकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस शिपाई रमीज राजा हे शहीद झाले होते. अशी माहिती काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी ६ मे रोजी शोपियां जिल्ह्यात चकमक उडाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तसेच एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवादी अल बदर दहशतवादी संघटनेचे होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com