श्रीनगर | Shrinagar

प्रजासत्ताक दिनी अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात LOC वर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात सैन्याचे चार जवान जखमी झाले. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव फसला. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अल-बद्रचे अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील फोनवरील चर्चेची ऑडिओ क्लिप मिळवली आहे. या चर्चेत ते काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-बद्र दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची एक टीम आणि त्या व्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षण दिलं जात आहे. अल-बद्रचे अतिरेकी आयईडी हल्ल्यांमध्ये पटाईत असल्याची माहिती समोर येत आहे. आयएसआयचे दोन कर्नल, रॅक ऑफिसर कर्नल वसीम आणि कर्नल रियाज संबंधित अतिरेक्यांच्या गटाला प्रशिक्षण देत आहेत. हत्यारांचा वापर कसा करावा, मोठे स्फोटक हल्ले करण्यासाठी मिनी ड्रोनचा उपयोग कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण अतिरेक्यांना देण्यात येत आहे.