जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; २४ तासात पाच दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; २४ तासात पाच दहशतवादी ठार

दिल्ली | Delhi

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा जवानांना (security force) मोठं मिळालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत पाच दहशतवाद्यांना (terrorist) ठार करण्यात आलं आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम (Kulgam) आणि पुलवामा (Pulwama) येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

कुलगाम (Kulgam) जिल्ह्यातील झोदार (Zodar) भागात दहशवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात दोन लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दुसरी चकमक ही पुलवामा जिल्ह्यातील पुचल (Puchal area of Pulwama) येथे दोन आणि हंडवारा येथे एक दहशतावादी ठार करण्यात आला आहे. हिजबूलचा (Hijbul) टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील चकमकीत मारला गेला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत गेल्या २४ तासात एकूण पाच दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com