Infosys चे सीईओ सलील पारेख यांना अर्थ मंत्रालयाकडून समन्स; काय आहे कारण?
Infosys CEO Salil Parekh

Infosys चे सीईओ सलील पारेख यांना अर्थ मंत्रालयाकडून समन्स; काय आहे कारण?

दिल्ली | Delhi

देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने समन्स जारी केले आहेत.

अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) नव्याने ई-फाईलिंग पोर्टल (E-filing portal) लॉन्च केलं आहे. मात्र, अडीच महिन्यांपासून त्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पारेख यांना समन्स बजावण्यात आलं असून, त्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांच्यासमोर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. इन्कम टॅक्स इंडियाच्या ट्विटरवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. ज्यात इन्फोसिसचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांना समन्स बजावण्यात आलं असल्याचं म्हटलेलं आहे.

'अर्थ मंत्रालयाने इन्फोसिसचे सीईओ तथा एमडी सलील पारेख यांना समन्स बजावलं आहे. २३ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांना हजर राहावं लागणार आहे. नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होऊन अडीच महिने झाले तरी पोर्टलमधील तांत्रिक अडचणी का सोडवता आलेल्या नाहीत, याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्पष्टीकरण देण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. २१ ऑगस्ट पासून पोर्टल कार्यरत नाही', असं इन्कम टॅक्स इंडियाने (Income Tax India) म्हटलं आहे.

इन्फोसिसला (Infosys) नेक्स्ट जनरेशन इन्कम टॅक्स फाईल करण्याची सिस्टीम (Next Generation Income Tax File System) विकसित करण्यासाठी २०१९ मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. यामागील उद्दीष्ट रिटर्नचा छाननी वेळ ६३ दिवसांवरून एक दिवसावर कमी करणे आणि रिटर्नच्या प्रक्रियेला गती देणे हा होता. नवीन इन्कम टॅक्स पोर्टल (New Income Tax Portal) http://www.incometax.gov.in ७ जून रोजी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. या पोर्टलवर सुरुवातीपासूनच तांत्रिक समस्या येत आहेत. यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २२ जून रोजी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. इन्फोसिसने ही नवीन वेबसाईट तयार केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com