Chandrayaan - 3 : ISRO आज लँडर अन् रोव्हरला जागवणार; तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पडला सूर्यप्रकाश

Chandrayaan - 3 : ISRO आज लँडर अन् रोव्हरला जागवणार; तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पडला सूर्यप्रकाश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारताची अंतराळ मोहिम चांद्रयान-3 (Chandrayaan - 3) यशस्वी झाल्यानंतर लँडर आणि रोव्हरने तब्बल 14 दिवस चंद्राच्या (Moon) पृष्ठभागाचा अभ्यास केला. चंद्रावर या 14 दिवसात रात्र झाली नव्हती. 15 व्या दिवशी रात्र होताच लँडर आणि रोव्हर स्लीप मोडवर गेले होते...

आता इस्रोने (ISRO) चंद्रावर पाठवलेले चांद्रयान-३ चे लँडर आणि रोव्हर मॉड्यूल पुन्हा एकदा सक्रिय करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होतील, याची शक्यता खूपच कमी असली तरीही आज इस्त्रोतील शास्त्रज्ञ लँडर आणि रोव्हरला जागवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Chandrayaan - 3 : ISRO आज लँडर अन् रोव्हरला जागवणार; तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पडला सूर्यप्रकाश
Maharashtra Rain Update : राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पुन्हा सकाळ झाली आहे. त्यामुळे इस्त्रोकडून लँडर आणि रोव्हरला जागवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लँडर आणि रोव्हर स्लीप मोडमधून उठून पुन्हा सक्रिय झाले, तर इस्रोसह सर्व भारतीयांसाठी ही बाब आनंददायी ठरेल.

Chandrayaan - 3 : ISRO आज लँडर अन् रोव्हरला जागवणार; तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पडला सूर्यप्रकाश
मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष धाडणार शिंदे, ठाकरेंना नोटीस

चंद्रावर बुधवारचा दिवस खूपच थंड होता. त्यामुळे आज सूर्यप्रकाश वाढल्यानंतर लँडर आणि रोव्हरला जागवले जाईल. ग्राऊंड स्टेशन कमाल सूर्यप्रकाश उपलब्ध झाल्यानंतर गुरुवार किंवा शुक्रवारी लँडर, रोव्हर मॉड्युल आणि ऑनबोर्ड उपकरणांना पुनरुर्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Chandrayaan - 3 : ISRO आज लँडर अन् रोव्हरला जागवणार; तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पडला सूर्यप्रकाश
Sukha Duneke : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खाची हत्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com