चांद्रयान-३ साठी आजचाच दिवस का निवडला? इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितले कारण

चांद्रयान-३ साठी आजचाच दिवस का निवडला? इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितले कारण

मुंबई | Mumbai

चांद्रयान-३ (Chandrayaan-3)अवघ्या काही तासातच चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. भारताचेच नव्हे तर संपुर्ण जगाचे भारताच्या या मिशन मूनकडे लक्ष लागले आहे. भारतीय अंतराळ संस्था (ISRO) ने म्हटले आहे की, चंद्रयान-३ मोहीम वेळापत्रकानुसार आहे आणि आज बुधवारी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंगसाठी (Soft Landing) सुरळीतपणे प्रगती करत आहे. भारत चंद्रावर उतरल्यावर अशी कामगिरी करणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवावर (South Pole) उतरणारा पहिलाच देश ठरणार आहे. या आधी अमेरिका, चीन, रशिया यांनी ही कामगिरी केली आहे.

चांद्रयान मोहिमेसाठी २३ ऑगस्टचा दिवस का निवडला

सध्या चंद्रावर रात्र आहे आणि २३ तारखेला सूर्योदय होणार आहे. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे दोन्ही सौर पॅनेल वापरून ऊर्जा मिळवू शकतील. चंद्रावर १४ दिवसांचा दिवस आणि १४ दिवसांची रात्र असते. लँडर सध्या चंद्राच्या कक्षेत क्षैतिजरित्या फिरत आहे. लँडिंगपूर्वी ते ९० अंशांवर सरळ केले जाईल. रॉकेट पृथ्वीवरून ज्या प्रकारे उड्डाण केले त्याच प्रकारे लँडर चंद्रावर उतरणार आहे.

चांद्रयान-३ साठी आजचाच दिवस का निवडला? इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितले कारण
काऊंटडाऊन सुरू : 'चांद्रयान-3'च्या लँडिंगकडे जगाचे लक्ष

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी काय सांगितले?

अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्याच्या २ तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com