VIDEO : इस्रोने पुन्हा इतिहास रचला! 'LVM3'चे प्रक्षेपण यशस्वी, पहिलेच व्यावसायिक उड्डाण

VIDEO : इस्रोने पुन्हा इतिहास रचला! 'LVM3'चे प्रक्षेपण यशस्वी, पहिलेच व्यावसायिक उड्डाण

दिल्ली | Delhi

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. शनिवारी १२.०७ मिनिटांनी ISRO LVM3 चे व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले आहे.

हे आत्तापर्यंतचे सर्वांत वजनदार रॉकेट आहे. त्याचबरोबर यूके-स्थित 'वन वेब' या कंपनीचे ३६ उपग्रहांचे देखील प्रक्षेपण केलं आहे. LVM3 M2/OneWeb India1 हे मिशन पूर्णत: यशस्वी झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे हे प्रक्षेपण पार पडले.

OneWeb ही एक ब्रिटिश खासगी उपग्रह कंपनी असून त्यांचे ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. याकामगिरीबरोबरच इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस मार्केटमध्येही प्रवेश केला आहे.

LVM-3 हे रॉकेट ४३.५ मीटर लांब असून आणि त्यात आठ हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच २०२३ मध्येही LVM-3 द्वारे आणखी ३६ OneWeb उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com