Israel Hamas Conflict : इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक, ३२४ पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू

Israel Hamas Conflict : इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक, ३२४ पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

हमास आणि इस्राइलमध्ये युद्ध सुरु असून इस्राइलने गाझापट्टीत आपले सैन्य उतरवले आहे. इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात ३२४ पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले असून सुमारे १ हजार जण जखमी झाल्याचे समजते. मृतांमध्ये ८८ महिला आणि १२६ मुलांचा समावेश आहे.

इस्राइल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूने आता जमिनीवरुन आमक्रण करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इस्राइलच्या सैन्याचे टॅक गाझापट्टीत जवळ जमा झाले आहेत. गाझापट्टीत इस्राइलच्या सैनिकांकडून छापे मारले जात आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

इस्त्राइलकडून गाझामध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे १ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com