मनेका गांधींना 'ते' वक्तव्यं भोवल; ISKCON ने पाठवली 100 कोटींची मानहानीची नोटीस

मनेका गांधींना 'ते' वक्तव्यं भोवल; ISKCON ने पाठवली 100 कोटींची मानहानीची नोटीस

दिल्ली | Delhi

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी भाजप खासदार मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. नुकताच मनेकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्या म्हणत आहेत की, इस्कॉन आपल्या गायी कसायांना विकते. सध्या भारतातील सर्वात मोठा फसवणूक करणारा इस्कॉन आहे.

याबाबतची माहिती देताना इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले आहे की, इस्कॉनवर पूर्णपणे निराधार आरोप लावल्याबद्दल मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस आम्ही आज पाठवली आहे. इस्कॉनचे भक्त, समर्थक आणि हितचिंतक यांचा जगभरातील समुदाय या बदनामीकारक, निंदनीय आरोपांमुळे अत्यंत दु:खी झाला आहे. इस्कॉनविरोधातील खोट्या प्रचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. त्यामुळे इस्कॉनने केलेल्या कारवाईने मनेका गांधी यांच्या अडचणीत वाढ केली आहे.

खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या इस्कॉनवर गंभीर आरोप करताना दिसत होत्या. मनेका गांधी यांनी म्हटले होते की, "देशातील सर्वात मोठे विश्वासघाती कोणी असेल तर ते इस्कॉन आहे. ही संस्था गोशाळेतील गाईंना कत्तलखान्यात विकते. मी अलीकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील गोशाळेत गेली होते. इस्कॉनकडून या गोशाळेच संचालन केलं जातं. तिथे गायींचा अवस्था खूपच खराब होती. गोशाळेत एकही बछडा नव्हता. याचा अर्थ ते गायी विकून टाकतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com