इसिसच्या सहा दहशतवाद्यांना अटक

शस्त्र व स्फोटके जप्त
इसिसच्या सहा दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली/श्रीनगर | New Delhi/Srinagar-

दिल्लीत शुक्रवारी इसिसच्या एका दहशतवाद्याला तर जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपुरा येथे शनिवारी पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून शस्त्र व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

त्यांच्याजवळ काही नकाशे आणि छायाचित्रही आढळून आली आहेत. यातील चौघांना बांदीपुरातून, तर एकाला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली आहे. इसिसच्या जम्मू-काश्मीर शाखेचे सदस्य आहेत, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली. काश्मिरातील भारतीय लष्कराच्या छावण्यांची माहिती घेण्यासाठी ते वेगवेगळे फिरत होते. या छावण्यांवर मोठा हल्ला करण्याची त्यांची योजना होती. याशिवाय, खोर्‍यातील तरुणांची इसिस व इतर अतिरेकी गटांमध्ये भरती करण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी इसिसचे हजारो झेंडेही तयार केले होते, असेही अधिकार्‍याने सांगितले

तर दिल्लीत शुक्रवारी रात्री दिल्लीत झालेल्या चकमकीनंतर अटक केलेल्या दहशतवाद्याकडे दोन प्रेशर कुकरमध्ये 15 किलो आयईडी होते. अबू युसूफ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो खोरसाना प्रांतातील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.

या दहशतवाद्याने काही महिन्यांपूर्वी गावामध्ये स्फोटकांची चाचणी केल्याचे पोलिसांना सांगितले. तो थेट ईसिस कमांडर्सच्या संपर्कात होता. पत्नी आणि चार मुलाचे त्याने पासपोर्ट सुद्ध बनवले होते. अबू युसूफ आधी युसूफ अलहिंदीच्या इशार्‍यावरुन काम करायचा. युसूफ अलहिंदी सिरियामध्ये मारला गेला. त्यानंतर तो अबू हुझाफाच्या सूचनांचे पालन करत होता. हा अबू हुझाफा पाकिस्तानी होता. अफगाणिस्तानाच ड्रोन हल्ल्यामध्ये हा हुझाफा मारला गेला असे स्पेशल सेलच्या डिसीपींनी सांगितले.

करोना व्हायरसमुळे त्याला त्याचे कट पूर्णत्वाला नेता आले नाहीत. 15 ऑगस्टला दिल्लीमध्ये हल्ला करण्याची त्याचा प्लान होता. पण दिल्लीतल्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामुळे त्याचा प्लान फसला असे स्पेशल सेलच्या डीसीपींनी सांगितले. अबू युसूफवर मागच्या वर्षभरापासून तपास यंत्रणा लक्ष ठेऊन होत्या.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com