करोनावरील उपचारासाठी कॅशलेस सुविधा द्या, आयआरडीएआय चे विमा कंपन्यांना आदेश

आरोग्य विमा असणार्‍यांना मोठा दिलासा
करोनावरील उपचारासाठी कॅशलेस सुविधा द्या, आयआरडीएआय चे विमा कंपन्यांना आदेश

नवी दिल्ली - भारतीय विमा नियामक आणि विमा प्राधिकरणने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना आपल्या ग्राहकांना नेटवर्क हॉस्पिटलमध्ये करोनाच्या उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयआरडीएआय ने जारी केल्या आहेत. सरकारनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. आरोग्य विमा असणार्‍यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

आता इतर आजारांसाठी रुग्णालय एखाद्या रुग्णाला कॅशलेस ट्रिटमेंटची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता करोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 एप्रिल ला आयआरडीएआय चे अध्यक्ष एस.सी. खुंटिया यांच्याशी चर्चेदरम्यान, कॅशलेस सुविधा न देणार्‍या विमा कंपन्यांबाबत येणार्‍या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचं सांगितलं आहे. जर एखाद्या रुग्णाने तक्रार केली, तर त्या विमा अर्थात विमा कंपनीविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, विमा पॉलिसी घेण्याआधी हे जाणून घेेणे आवश्यक आहे, की त्यात कोण-कोणते आजार कव्हर केले आहेत. यासाठी आरोग्य विमा योजनेची यादी चेक करा. त्याशिवाय इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेश्यो चेक करा. यामुळे कंपनीने इलाजाच्या खर्चाचे आतापर्यंत किती लोकांचे पेमेंट केले आहे, याची माहिती मिळेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com