राम मंदिर भूमिपूजनाचे सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
देश-विदेश

राम मंदिर भूमिपूजनाचे सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

गोविंदगिरी महाराज यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुणे | Pune - उत्तरप्रदेशातील अयोध्येत बांधण्यात येणार्‍या राम मंदिराचे भूमिपूजन bhoomi poojan ceremony of Ram temple पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते Prime Minister Narendra Modi येत्या 5 ऑगस्टला होणार आहे. याशिवाय, या कार्यक्रमात देशभरातील 150 मान्यवरांना निमंत्रण दिलं जाणार आहे. तसेच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलं जाणार आहे Invitation to all Chief Ministers अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री गोविंदगिरी महाराज govindgiri maharaj यांनी दिली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे दरम्यान, फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

राम मंदिराच्या उभारणीबाबत गोविंदगिरी महाराज म्हणाले, राम मंदिराची उभारणी गुजरातमधील सोनपुरा कुटुंब करणार आहे. याच कुटुंबानं प्रसिद्ध सोमनाथचं मंदिर, अंबाजींचं मंदिर बांधलं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणी देखील त्यांनी केली आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एलअँडटी) कंपनी त्यांना सहकार्य करणार आहे.

राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे 161 फूट असणार आहे. हे मंदिर दोन मजली असेल या दोन मजल्यांवर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आलं आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यानवर 161 फूटांचं मंदराचं बांधकाम होणार आहे. अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात 20 फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे. तसेच अधिक तीन शिखरं करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे, असंही यावेळी गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं.

Deshdoot
www.deshdoot.com