मुंबई | Mumbai -

करोना आणि आर्थिक विकासाच्या निराशाजनक आकडेवारीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवार सकाळपासून जोरदार विक्री सुरू केल्याने

निर्देशांक 650 अंकांनी कोसळला. निफ्टीत 140 अंकांची घसरण झाली आहे. अवघ्या तासभरात गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका बसला आहे. सध्या बाजारात सर्वच क्षेत्रात जोरदार विक्री सुरु आहे. एचडीएफसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टीसीएस, आयटीसी, एसबीआय आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे.

गुरुवारी निफ्टी 7.55 अंकांनी घसरला मात्र निफ्टीने 11,500 अंकांची पातळी कायम ठेवली. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स 95.09 अंकांनी घटला आणि 38,990.94 अंकांवर विसावला. व्होडाफोन आयडियाचा स्टॉक 29.80 टक्क्यांनी वाढला होता. भारती इन्फ्राटेल लिमिटेडला इंडस टॉवर मर्जरच्या बोर्डकडून करारास मंजूरी मिळाली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स 11.09 टक्क्यांनी वधारले तो 217.80 रुपयांवर बंद झाला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठे अवमूल्यन झाले. रुपया 73.47 रुपयांवर बंद झाला. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी घसरण ठरली. अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराने ठोसपणे व्यापार केला. युरोची विक्री करताना युरोपियन मध्यवर्ती बँकेसमोर चिंता होती, पण अमेरिकी डॉलरने आजच्या सत्रात नफा कमावला. आजच्या व्यापारी सत्रात, नॅसडॅकने 0.98 टक्के, निक्केई 225 ने 0.94 टक्के, एफटीएसई 100 ने 0.85 टक्के आणि एफटीएसई एमआयबीने 1.00 ची वृद्धी घेतली तर हँगसेंग 0.45 टक्यांची घसरण झाली.

युपीएल : ग्लोबल रिसर्च फर्मने युपीएलचे शेअर्स 620 रुपये प्रति शेअर या लक्ष्यित किंमतीवर विकत घेण्याचा निर्णय कायम ठेवला. यानंतर कंपनीचे स्टॉक्स 4.42% नी वधारले व त्यांनी 523.00 रुपयांवर व्यापार केला.

पेज इंडस्ट्रिज लि. : कंपनीने 2021 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ तोटा 39.6 कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. तर कंपनीचा महसूलदेखील 65.9% नी घटला व 284.4 कोटी रुपयांवर आला. कंपनीचे स्टॉक्स 2.79% घसरले व त्यांनी 19,1400.00 रुपयांवर व्यापार केला.

पॉवर मेक प्रोजेक्ट्स लि. : कंपनीला 1,311.70 कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर मिळाली. यासंबंधीचे लेटर ऑफ इंटेंट/एल1 पत्रही सूचना म्हणून मिळाले. कंपनीचे स्टॉक्स 4.80 टक्क्यांनी वाढले व त्यांनी 456.00 रुपयांवर व्यापार केला.