नीरव मोदीच्या पत्नीविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट

मनी लॉण्ड्रिंग प्रकरण
नीरव मोदीच्या पत्नीविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट

नवी दिल्ली | New Delhi -

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या पत्नी विरोधात भारतातील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी इंडिटरपोलने

रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून ओळखले जाते.


इंटरपोलकडून याआधी नीरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वी यांच्याविरोधातही नोटीस काढण्यात आली आहे. यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येईल. Interpol issues global arrest warrant against Nirav Modi's wife

नीरव मोदीची पत्नी अमी मोदीला 2019 मध्ये अमेरिकेत पाहण्यात आलं होतं. तपास यंत्रणांना सध्या ती नेमकी कुठे आहे याबद्दल खात्रीलायक माहिती नाही. दुसरीकडे पंजाब बँक घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला ब्रिटनमधील न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं होतं. गतवर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून नीरव मोदी लंडनमधील वांड्सवर्थ कारागृहात बंद आहे.

याआधी नीरव मोदीच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण करण्यावरुन सध्या सुनावणी सुरु आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेसोबतच इतर जवळपास कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतात वेगवेगळ्या यंत्रणांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. याप्रकरणी नीरव मोदीसोबत मेहुल चोक्सीही फरार आहे.

ईडीने जुलै महिन्यात नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई केली होती. ईडीकडून नीरव मोदीची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळीमधील समुद्र महल येथील चार फ्लॅट, फार्म हाऊस, अलिबागमधील जमीन, लंडनमधील फ्लॅट, युएईमधील घर आणि इतर गोष्टींचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com