International Yoga Day 2021 : 'आंतरराष्ट्रीय योग दिन' २१ जून रोजीच का साजरा केला जातो?

काय आहे या वर्षीची थीम?, जाणून घ्या
International Yoga Day 2021 : 'आंतरराष्ट्रीय योग दिन' २१ जून रोजीच का साजरा केला जातो?

योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. भारतातील प्राचीन शास्त्र असलेल्या योगाची महती संपूर्ण जगाला पटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जावू लागला. २०१५ पासून योग दिन साजरा केला जात असल्याने आज सातवा योग दिन साजरा होत आहे.

दरवर्षी योग दिन वेगवेगळ्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. यावर्षीच्या योग दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी एट होम’ म्हणजेच ‘योगासह रहा, घरी रहा’ अशी आहे. गेल्या वर्षीची थीम ‘घरी राहून योगा करा’ अशी होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळं घरीच राहून योगा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

करोना कालावधीत योगाची उपयुक्तता खूप वाढली आहे. कोविड मधून बरे झाल्यानंतर ही बर्‍याच लोकांना योगाचा खूप फायदा झाला. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जात आहे. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की जागतिक योग दिनाची पार्श्वभूमी काय?, योग्य दिन २१ जुनलाच का साजरा केला जातो?, जाणून घेऊयात त्याबद्दल..

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.

सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.

२१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com