International Olympic Day 2020
International Olympic Day 2020
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिवस २०२०

२३ जून १९४८ ला साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम या देशांनी एकत्रित येऊन पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आयोजित केला.

Nilesh Jadhav

२३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करणे हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस २३ जून १९४८ ला साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम या देशांनी एकत्रित येऊन पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आयोजित केला. तत्कालीन या संघटनेच्या अध्यक्षानी जगभरातील तरुणांना ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन खेळाला त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले होते.

सध्या जगभरात करोना ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा फटका या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धांना देखील बसला आहे. करोनाने सर्वच गोष्टी ऑनलाईन होत असल्याने या वर्षीचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा डिजिटल पद्धतीने साजरा करणार आहे. संघटनेने आज एका खास सत्राचे आयोजन केले आहे. काही ऑलिम्पिक विजेत्यांकडून त्यांच्या चॅनल वरून जगभरातील चाहत्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस घरात साजरा करण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये यूएसएची जिम्नॅस्ट लॉरी हर्नांडेझ, पाचवेळा ऑलिम्पिक बायथलॉन चॅम्पियन असलेला फ्रान्सचा मार्टिन फोरकेड, भारताचा स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट, चीनचा स्कीयर गु आयलिंग आयलीन, टोंगाच्या पीटा टॉफॅटोफुआ या खास सत्राला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर #StayHealthy #StayStrong आणि #StayActive हॅशटॅगचा वापर केला जात आहे. या थेट कार्यक्रमांमध्ये जपान, कझाकस्तान, सेनेगल, नायजेरिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि रशियासारख्या देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com