आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक  31 जुलैपर्यंत बंद
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंद

केवळ मालवाहतूक तसंच वंदे भारत अभियान अंतर्गत उड्डाणांना परवानगी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली - करोना संकटामुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे. आता 31 जुलै 2020 पर्यंत व्यावसायिक उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर 15 जुलै 2020 पर्यंत बंदी होती.

तथापि, हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि डीजीसीएमार्फत(नागर विमानन महानिदेशालय) सुट देण्यात आलेल्या उड्डाणांना लागू होणार नाही. काही दिवसांपासून अशी अटकळ सुरू होती की देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल.

दरम्यान, या सर्व चर्चांना डीजीसीएने पूर्णविराम लावला आहे. केवळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूक तसंच वंदे भारत अभियान अंतर्गत उड्डाणांना परवानगी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com