दिल्लीत स्वातंत्र्यदिनापूर्वी ड्रोनच्या सहाय्यानं हल्ल्याची शक्यता; अलर्ट जारी

दिल्लीत स्वातंत्र्यदिनापूर्वी ड्रोनच्या सहाय्यानं हल्ल्याची शक्यता; अलर्ट जारी

दिल्ली | Delhi

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी (Intelligence Bureau) दिल्ली पोलिसांना (Delhi Police) मोठा इशारा दिला आहे.

सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून राजधानी दिल्लीवर ड्रोनच्या सहाय्याने दहशतवादी हल्ला (Terror Attack ) करण्याचा कट रचला जात आहे.

१५ ऑगस्टच्या (August 15) पार्श्वभूमीवर ड्रोनच्या (Drone Terror Attack) सहाय्याने देशाच्या राजधानीला हादरवून टाकण्याचा कट असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आलाय. तसंच यंदा चार अँटी ड्रोन सिस्टम लाल किल्ल्यावर लावण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी दोन अँटी ड्रोन सिस्टमचा वापर करण्यात आला होता.

एकीकडे एजन्सींने इशारा दिला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली पोलिस आणि इतर राज्यांतील पोलिसांना ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात दोन स्तरांचे प्रशिक्षण आहे. पहिल्या प्रशिक्षणात सॉफ्ट किल (Soft Kill) आहे, ज्या अंतर्गत सामान्य ड्रोन पाहिल्यास कारवाई कशी करावी हे शिकवले गेले आहे. हार्ड किल (Hard Kill) असे दुसर्‍या प्रशिक्षणाचे नाव आहे, म्हणजे जर एखादे संशयास्पद ड्रोन किंवा उड्डाण करणारे उपकरण दिसले तर त्यावर कारवाई कशी करावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com