PHOTO : समुद्रातील 'सायलंट किलर' भारतीय नौदलात दाखल

PHOTO : समुद्रातील 'सायलंट किलर' भारतीय नौदलात दाखल

मुंबई l Mumbai

प्रोजेक्ट-७५ च्या सहा पाणबुड्यांच्या मालिकेतील चौथी पाणबुडी, 'आयएनएस वेला' आज नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे हा औपचारिक सोहळा झाला.

फ्रान्सच्या मे. नेव्हल ग्रुपच्या (पूर्वीची डीसीएनएस) सहकार्याने मुंबईतल्या माझगाव डॉक शिपयार्डस लिमिटेडद्वारे स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्या बांधल्या जात आहेत. नौदलाच्या ताफ्यात या श्रेणीतली चौथी पाणबुडी समाविष्ट होणे हा आजचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयएनएस वेला ही पश्चिम नौदल कमांडच्या पाणबुडीच्या ताफ्याचा भाग असेल आणि शस्त्रागाराचा आणखी एक शक्तिशाली भाग असेल.

संसद सदस्य अरविंद सावंत, पश्चिमी नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अडमिरल आर. हरी कुमार, माझगाव जहाजबांधणी गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉईस अडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी आयएनएस वेला या पाणबुडीच्या नौदल सेवेत दाखल झाल्यानिमित्त आयोजित समारंभात उपस्थित होते.

याधीच्या वेला या रशियन बनावटीच्या फॉक्सट्रॉट श्रेणीच्या आणि 2009 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पाणबुडीचा कर्मचारीवर्ग देखील या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून हजर होता. संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आजच्या समारंभाला उपस्थित होते. वर्ष २००९ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पूर्वीच्या ‘वेला’ या रशियन वंशाच्या फॉक्सट्रॉट श्रेणीतील पाणबुडीचे सदस्य या वेळी पाहुण्यांमध्ये उपस्थित होते.

स्कॉर्पिन पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली असून त्यात प्रगत स्टेल्थ (गुप्त) वैशिष्ट्ये आहेत. त्या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित पाणसुरूंग तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक 'सोनार' आणि सेन्सर संच असल्याने त्यांच्यात उत्कृष्ट कार्यान्वयन क्षमता असते. त्यांच्याकडे प्रॉपल्शन मोटर म्हणून प्रगत परमनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर (PERMASYN) देखील आहे.

'वेलाची' निर्मिती हे नौदलाद्वारे स्वयंनिर्मितीच्या क्षमतांना 'बिल्डर्स नेव्ही' म्हणून आपले स्थान मजबूत करण्याच्या दिशेने देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाची पुष्टी आहे. तसेच एक प्रमुख जहाज आणि पाणबुडी बिल्डिंग यार्ड म्हणून माझगाव डॉक लिमिटेडच्या क्षमतांचेही द्योतक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘सुवर्ण विजय वर्ष’ या सोहळ्यांसोबत पाणबुडीच्या जलावतारणाचा हा सुवर्णयोग साधला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com