
मुंबई | Mumbai
भारतीय नौदलाची (Indian Navy ) ताकद आता आणखी वाढणार असून, नव्या अस्त्रानं शत्रूला घाम फुटणार हे नक्की आहे. कारण, भारतीय नौदलात भारतीय नौदलात आज पाचवी कलवरी वर्गाची पाणबुडी 'आयएनएस वागीर' सामील झाली आहे.
यानिमित्त आयोजित समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'आयएनएस वागीर' पाणबुडी पूर्णपणे भारतात बनवटीची आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे या पाणबुडीची निर्मिती झाली आहे.
आयएनएस वागीर ही शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही ने येता ही आयएनएस वागीर शांततेत आपले लक्ष उद्ध्वस्त करू शकते. ही पाणबुडी डिझेल तसेच इलेक्ट्रिकवर चालत असून समुद्रात भूसुरुंग टाकण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. ही समुद्रात तब्बल ३५० मीटर खोलवर जाऊ शकते.
तसेच अनेक महीने ती पाण्याखाली राहू शकते. ही पाणबुडी स्टेल्थ प्रकारातील असून ती शत्रूच्या रडारला देखील चकवा देऊ शकते. या पाणबुडीत अत्याधुनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली असून ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक तिचा अचूक वेध घेऊ शकते. 'आयएनएस वागीर' पाणबुडी ही सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते.
Project-75 अंतर्गत पाच पाणबुड्या नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यात INS Kalvari, INS Khanderi, INS Karanj, INS Vela आणि INS Vagir यांचा समावेश आहे.